चांदण्या रात्री आकाशाकडे बघुन ढगांच्या पलीकडे जग पहावं ।
कुशित घेउन तारे मोजावे..
वाटावं असं कोणीतरी असावं ।
धग धगत्या आयुष्यात विसावा घ्यावा..
ज्वलंत जिवनाचं चित्र निर्माण करावं..
हातात हात घेउन चालत राहावं..
असं कोणीतरी असावं ।
ओलावलेल्या पापण्यांच्या कडा पुसून थेट ह्रुदया पर्यंत पोचावं ।
असं नक्षत्रा सारखं कोणीतरी असावं
" आज तुझी खुप आठवण येतेय गं "